आता देशात होणार डिजिटल जनगणना | जन्म – मृत्यूची नोंदही होणार लिंक

0
245

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या रोगामुळे देशात गेल्यावर्षी जनगणनेची प्रक्रिया राबवण्यात आली नाही. भारतात दर दहा वर्षांनी जनगणना प्रक्रिया राबवली जाते. यापूर्वी ही प्रक्रिया कागदोपत्री केली जायची. पण आता जनगणना प्रक्रियेचं डिजिटलायझेशन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. ही प्रक्रिया डिजिटल केल्यामुळे मोजणी प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. एवढंच नव्हे तर, जन्म आणि मृत्यू बाबतचं रजिस्टरही याला जोडण्यात (लिंक) येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.