आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका | राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

0
167

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुले पत्र  लिहिले आहे.  राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे;  सत्ता येत – जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही, असे मुख्यमंत्र्यांना सुनावत राज ठाकरेंनी भोंग्याच्या प्रश्नी होणारी मनसे कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या धरपकडीवर आक्रमक भूमीका घेतली आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा देखील राज ठाकरेंनी यावेळी दिला आहे.

“भोंगे उतरवा आंदोलनावरून गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की,  मशिदीमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का?”,  असा सवाल राज ठाकरेंनी या वेळी उपस्थित केला.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.