सावंतवाडी : साई कार्डीयाक कोल्हापूर रुग्णालयामध्ये अॅडमिट असलेल्या सिंधुदुर्गमधील यशवंत भोवर या रुग्णाला आॅपरेशन दरम्यान दोन रक्तदात्यांची आवश्यकता होती. यावेळी युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून कोल्हापूर मधील ओंकार शेडगे यांच्या सहकार्यातून रक्तदाते उपलब्ध करून देण्यात आले. प्रसाद दोणे, रोहित गायकवाड यांनी शाहू रक्तपेढीमध्ये रक्तदान करत रुग्णाला जीवदान दिले. याबद्दल युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी त्यांचे आभार मानले आहेत