कासार्डे :
कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील तर्फेवाडीचे जागृत देवस्थान श्री पिंपळेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, देव प्राण प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा 13 ते 16 मे कालावधीत होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळ्यास विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार (ता.13) सायंकाळी 3 ते 7 वाजता बंडवाडी शाळा ते पिंपळेश्वर मंदिरापर्यत कलश ( सडे वाघोटने ढोल ) पथकासह सवाद्य मिरवणूक, रात्री 9 वाजता स्थानिक भजन, जीर्णोदधार मुख्य सोहळा शनिवार (ता. 14 ) सकाळी 9 ते 1 दुपारी कलशारोहन, होमहवन, देवाची प्राणप्रतिष्ठापना, अभिषेक नंतर 1 ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद , संध्याकाळी 4 ते 7 होम मिनीस्टर व रात्री 8 ते 11 वाजेपर्यत स्थानिक भजन, रविवार (ता. 15) दुपारी 2 ते 5 श्री सत्यनारायणाची महापूजा , संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत हळदीकुंकू, संध्याकाळी 7 ते 8 स्थानिक वाडीतील वयोवृद्धाचा सत्कार नंतर रात्री 8 वाजता महाप्रसाद ,रात्री 9 वाजता रंगारंग कार्यक्रमा अंतर्गत भजनी बुवा संतोष आरावकर (राजापूर) व बुवा गणेश जांभळे ( राजापूर) आणि बुवा संदीप पुजारे ( देवगड ) यांच्यात आमने सामने तिरंगी भजनांचा जंगी सामना होणार आहे. तर सोमवार (ता.16 )दहीकाला उत्सव साजरा करून कार्यक्रमाची सांगता करणार असल्याने, तरी या सर्व धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी व रसिकांनी घ्यावा असे आवाहन पिंपळेश्वर कासार्डे तर्फेवाडी मंडळाचे सचिव दिनेश तर्फे यांनी केले आहे.