मंत्री नारायण राणेंना मोठा दिलासा | न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

0
72

धुळे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना धुळे जिल्हा व सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी धुळे न्यायालयाने केंद्रीय मंत्री राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणी धुळ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिकांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दाखल गुन्ह्यासंदर्भात नारायण राणे यांचे वकील ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम यांच्याकडून धुळे सत्र न्यायालयात ४ मे रोजी अटक पूर्व जामीन प्रकरण दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणी आज धुळे जिल्हा व सत्र न्यायधीश आर. एच. मोहंमद यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.