देवगडात सरकारी कामात अडथळा व चोरी प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार

0
740

देवगड : देवगड तालुक्यातील ईळये महावितरण शाखेचे कनिष्ठ अभियंता सिद्धरुढ श्रीकांत तेवरे  (३०) (रा जामसंडे)यांना कार्यालयात घुसून तुमचे काम थांबवा आधी माझे अर्जावर सही  करा असे मोठ्या आवाजाने बोलत सरकारी कामात अडथळा निर्माण केला व शासकीय सिमकार्ड असलेला मोबाईल घेऊन जात असताना शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुणकेश्वर (वाळकेवाडी)येथील राजेश सुरेश वाळके याच्या विरुद्ध देवगड पोलिसात गुन्हा दाखल केला तर तेवरे यांनी एकमेकांच्या संगमताने व सहाय्याने वाळके यांच्या शेतातील अनाधिकार प्रवेश केला शेतात बसविलेल्या शेतीपंपाची विद्युत वहिनी सुरू ठेवल्याने  विहिरातील पाणी संपले तसेच पंप सुरू राहिल्याने  पंपाचे वायडिंग जळाले तसेच  बागेतील आंबे व नारळ चोरल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता सिद्धरूढ तेवरे यांच्या विरोधात  देवगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे दोन परस्पर विरोधात गुन्हे दाखल झाले असून यातील एका गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक पी व्ही शिवगण तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास  पोलीस नाईक राजन पाटील करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.