पोलिसांना १० मिनिटं बाजूला करा | ओवेसीला औरंगजेबाकडेच पाठवतो : नितेश राणे

0
477

मुंबई : राज्यातील पोलिसांना १० मिनिटांसाठी बाजूला केले तर अकबरुद्दीन ओवेसी यांना औरंगजेबाकडेच पाठवू. अन्यथा आम्ही स्वत:ला शिवरायांचे मावळे म्हणवून घेणार नाही, असे वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी शेकडो कार्यकर्त्यांसह औरंगाबादेतील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पाणचक्की, दौलताबाद, खुलताबाद येथील दर्ग्यांना तसेच औरंगजेबाच्या कबरीला त्यांनी भेट दिली होती. यावरून सध्या राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे.

या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ट्विट करून अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर आगपाखड केली. आम्ही शिवरायांचे मावळे नाहीत. मी आव्हान करतो, पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर, आम्ही शिवरायांचे मावळे नाही, असे नितेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. याशिवाय, नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवरही आगपाखड केली आहे. काहीही केले तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल, कारण राज्यात “नामर्दांचे सरकार आहे”, ही गोष्ट अकबरुद्दीन ओवेसी यांना माहिती आहे, असेही नितेश राणे यांनी म्हटले.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.