सावंतवाडीत उद्या मोफत रुग्ण तपासणी शिबिर…!

0
53

सावंतवाडी : येथील राणी जानकीबाई वैद्यकीय संस्थेच्या संलग्न रुग्णालयात शनिवारी सकाळी १० ते २ या वेळेत मूळव्याध, भगंदर व फिशर या आजाराच्या रुग्णांची मोफत तपासणी शिबिर आयोजित केले आहे.

या शिबिरासाठी कोल्हापूर येथील तज्ज्ञ डॉ. वीरधवल पाटील व सावंतवाडी येथील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. राजेश गुप्ता उपलब्ध राहणार आहेत. तरी सावंतवाडी परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. यासाठी रुग्णालयाच्या बाह्य विभागात नाव नोंदणी करावी, असे आवाहन प्रा. डॉ. बाबासाहेब पाटील व अध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.