सावंतवाडीचे मुख्याधिकारी जावडेकर ठरलेत उत्कृष्ट मुख्याधिकारी…!

0
60

सावंतवाडी : येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना क वर्ग नगरपरिषद गटातून उत्कृष्ट मुख्याधिकारी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

याबाबतचे प्रशस्तीपत्र नगरपरिषद प्रशासन विभागाचे उपायुक्त रवींद्र जाधव यांनी दिले आहे. २०२१-२२ वर्षं नगरपरिषद क्षेत्रात प्रभावीपणे पुरविलेल्या सर्व आवश्यक मूलभूत नागरी सुविधा व विविध शासकीय योजना तसेच नागरिक कर्मचारी पदाधिकारी व शासन यांच्या समन्वयातून केलेल्या शासकीय कामकाजाचा आढावा लक्षात घेता त्यांना गौरविण्यात आले असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.