दोडामार्ग : दोडामार्ग पोलीस ठाण्याचे नूतन निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी व माजी जिल्हा बँक संचालक प्रकाश गवस यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक संतोष नानचे, संजय विर्नोडकर आदी उपस्थित होते. दोडामार्ग पोलीस ठाण्याचे नूतन निरीक्षक म्हणून ऋषिकेश अधिकारी यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे.
अधिकारी यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारत काम सुरू केलं आहे. यापूर्वी ते सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत होते. श्री. अधिकारी हे मूळ रायगड येथील आहेत. त्यांना नाडकर्णी व गवस यांसह भाजप पदाधिकारी यांनी सदिच्छा दिल्या असून दोडामार्ग तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही श्री. अधिकारी यांनी दिली आहे.