सोसायटीत लाखोंचा घोटाळा ; विद्यमान चेअरमन, सचिवांवर प्रकाश गवस यांचा आरोप

0
57

दोडामार्ग : आयी विविध कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन व सचिव या दोघांनीही गेल्या तीन वर्षात सहकार खात्याचे सर्व नियम धाब्यावर बसवून लाखो रूपयांचा घोटाळा केला आहे. ५०० रूपयापेक्षा अधिकची रक्कम चेअरमन वा सचिव यांनी हाती ठेवणे गैर असून लाखोंची रक्कम आपल्या हाती ठेवणार्‍या या लोकांनी लाखोंचा अपहार केल्याची तक्रार जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश गवस यांनी दोडामार्ग येथील सहाय्यक निंबंधक कार्यालयात केली आहे. आपण काही झाले तरी हा अपहार आता पुराव्यानिशी सिद्ध करणार असून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल होईतोवर लढणार असल्याची माहिती प्रकाश गवस यांनी पत्रकारांना त्यांनी दिली. त्यामुळे आपण आयी सेवा सहकारी संस्थेतील ‘अण्णा हटाव’ मिशन हाती घेतल्याचा एल्गार गवस त्यांनी केला. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, संतोष नानचे, संजय विरनोडकर उपस्थित होते .तत्पूर्वी त्यांनी दोडामार्ग येथे सहाय्यक निंबधक कार्यालयात पल्लवी पई मॅडम यांच्याकडे आपली तोंडी तक्रार नोंदवली. त्यांनी याबाबत आपण वरिष्ठांना कल्पना देऊ असे आश्वासन प्रकाश गवस, एकनाथ नाडकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांना दिले आहे. आपण जि तक्रार करत आहे ती ऑडिट रिपोर्ट पाहून करत आहोत. आपण गप्प बसणार नाही. आम्हीही सहकार क्षेत्रांत काम केलंय आमच्याकडे कोणी ते बोट दाखवावे. पण आयी विविध कार्यकारी सोसायटीत विद्यमान चेअरमन व सचिव यांनी जो गैरकारभार केलाय तो गंभीर आहे. आणि आपण त्याविरुद्ध आवाज उठविला असून गप्प बसणार नाही. चार लाख रक्कम धान्य दुकानापैकी हाती ठेवणे, वर्षाने मजुरी देणे, हमाली दाखवणे असे कित्येक मुद्दे मांडत त्या संस्थेचा कारभार चुकीचा असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. या संस्थेचे शासकीय ऑडिट झालं पाहिजे अशी मागणी गवस यांनी नोंदवली आहे. आपण याविषयी गंभीर असल्याचे प्रकाश गवस यांनी म्हटले असून संबंधिताना मोठं चॅलेंज दिले आहे.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.