कोकण चित्रपट महोत्सवाची उद्या सांगता !

0
29

सावंतवाडी : सिंधुरत्न कलावंत मंच आयोजित कोकण चित्रपट महोत्सव २०२२ चा दिमाखदार सांगता सोहळा उद्या दिनांक १४ मे रोजी मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात सायंकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे. यावेळी सिंधुरत्न कलावंत मंच आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभ सोहळा देखील संपन्न होणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, कॉमेडी किंग सिद्धार्थ जाधव, निर्माता व अभिनेता विजय पाटकर यांच्यासह अनेक दिग्गज कलावंत, दिग्दर्शक, निर्माते व मराठी चित्रपट व्यवसायातील नामवंत मंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन चित्रपट क्षेत्रातील मान्यवर मंडळी च्या मार्गदर्शनाचाही लाभ घेण्याचे आवाहन सिंधुरत्न कलावंत मंच कार्यकारी मंडळाने केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.