माजी सभापती पंकज पेडणेकर यांना पितृशोक !

0
43

सावंतवाडी : तळवडे बाजारपेठ येथील जेष्ठ व्यापारी अनिल विनायक पेडणेकर (वय वर्षे 68, रा. तळवडे पेडणेकरवाडी ) यांचे शुक्रवारी सायंकाळी आकस्मित निधन झाले. तळवडे बाजारपेठ गेट येथील किराणा मालाचे व्यापारी तसेच आंबा व्यावसायिक म्हणून ते प्रसिद्ध होते.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे दोन मुली तीन भाऊ, भावजया ,बहीणी असा मोठा परिवार आहे. सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजपचे युवा कार्यकर्ते पंकज पेडणेकर यांचे ते वडील होत. तळवडे व्यापारी संघटना मजबुती करणासाठी त्याचे मोलाचे कार्य होतें, सामजिक कार्यात सदैव ते अग्रेसर असायचे,त्याचे अचानक निधन झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तळवडे व्यापारी संघाचे ज्येष्ठ सल्लागार पण होते . तळवडे व्यापारी संघटनेच्या प्रत्येक कार्यात मोलाचे सहकार्य असायचे. उद्या सकाळी त्याच्यावर अत्यसस्कर होणारं आहेत. तसेच उद्या तळवडे बाजारपेठ दुपार पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.