महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचा १४ वा वर्धापन दिन सोहळा उद्या माणगावात

0
106

सावंतवाडी : महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचा १४ वा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त रविवारी  १५ मे रोजी माणगाव बाजार त्रिमूर्ती सभागृहात सकाळी १० वाजता जिल्हा गवळी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या गवळी समाज मेळाव्याला महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक दाते, उपाध्यक्ष पांडुरंग काते, सरचिटणीस राजेंद्र महाडिक, खजिनदार गंगाराम महाडिक, सरचिटणीस प्रशांत केळुसकर आदी मान्यवरांसह ट्रस्टचे सर्व विश्वस्त उपस्थित राहून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गवळी समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत.
या गवळी समाज जिल्हा मेळाव्याचे औचित्य साधून हळदी कुंकू, रांगोळी व वक्तृत्व स्पर्धा, विद्यार्थी गुणगौरव, दहावी-बारावीनंतर करिअरच्या संधी याबाबत व्याख्यान आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त गवळी समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष दशरथ शृंगारे, उपाध्यक्ष बाबुराव भालेकर, चिटणीस रामदास बुराण यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.