गोव्याचे मुख्यमंत्री उद्या सिंधुदुर्गात

0
84

सिंधुदुर्ग : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शनिवारी (दि. १४) सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
सकाळी १०.३० वा. मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथील अखिल भारतीय कोकणी परिषदेचे उद््घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १२ वा. मालवण येथील भाजप कार्यालयात ते पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ५.३० वा. शिरोडा (ता. वेंगुर्ला) येथील श्री महामूळ माया देवस्थानला ते भेट देतील. त्यानंतर सायं. ७ वा. आजगाव येथील श्री वेतोबा देवस्थानाचे दर्शन घेऊन गोव्याकडे प्रयाण करणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.