पिकुळेतिठा ते देऊळवाडी रस्ता होणार हॉटमिक्स डांबरीकरण | आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ

0
77

दोडामार्ग : पिकुळे तिठा ते देऊळवाडी येथील रस्ता कामाचा शुभारंभ आमदार दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते शुक्रवारी पिकुळे देऊळवाडी येथे करण्यात आला. आमदार तथा माजी पालकमंत्री दिपकभाई केसरकर यांच्याच शिफारशीने 2021-22 च्या बजेटमधून पिकुळे तिठा ते देऊळवाडी रस्ता मंजूर झाला होता. मात्र कोरोना काळात संबंधित ठेकेदाराकडून या रस्त्याचे काम केले गेले नाही. गेले वर्षे भर त्या ठेकेदारांनी या कामांसाठी दिरंगाई केल्यामुळे अखेर संबंधित ठेकेदार बदलून उर्वरित काम दुसरा देण्यात यावे, अशा सुचना स्वतः आमदार केसरकर यांनी सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंता यांना केल्या होत्या. त्यांनुसार पहिल्या ठेकेदारांला बदलून नवीन ठेकेदारांला काम देण्यात आले. आता या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण काम करण्यात येणार असून त्याच उर्वरीत कामांचा शुभारंभ शुक्रवारी आमदार केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हा संघटक संजय गवस, कोनाळ विभाग प्रमुख संतोष मोर्ये, तिलकांचन गवस, संदिप गवस, उपविभाग प्रमुख व माजी सरपंच अनंत शेटकर, सरपंच दिक्षा महालकर, विनय गवस, ज्ञानेश्वर गवस, वसंत गवस , माजी तंटामुक्त अध्यक्ष संदिप गवस तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.