बलात्कार प्रकरणी स्वाभिमानच्या महिला पदाधिकाऱ्यांची  सावंतवाडी पोलीस ठाण्यावर धडक

0
1612
सावंतवाडी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची  सावंतवाडी पोलीस ठाण्यावर धडक दिली. अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी ‘स्वाभिमान’ची महिला ब्रिगेड आक्रमक झालीय. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात असा प्रकार, ही पालकमंत्र्यांची निष्क्रियता असल्याचा त्यांनी आरोप केलाय.हे प्रकरण राजकीय दबावाखाली दडपल जाण्याची शक्यता आहे म्हणून पोलीस ठाण्यावर  धडक दिल्याच आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. जर पिडीत मुलीला लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर या आठ दिवसात पालकमंत्र्यांच श्राद्ध घालणार. जे आपला तालुका सांभाळू शकत नाही ते राज्य काय सांभाळणार, अशी जोरदार टीका महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे यांनी केली. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे,जि.प.अध्यक्ष रेश्मा सावंत,सावंतवाडी स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब,पं.स. सभापती पंकज पेडणेकर ,गीता परब, महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर, जि.प. सदस्य उन्नती धुरी, पं.स. सदस्य सुनंदा राऊळ, नगरसेविका दिपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, उपसभापती निकिता सावंत आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.