शेअर बाजार सावरतोय…!

0
140

मुंबई : अमेरिकी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये संमिश्र वातावरण होते. डाऊ जोन्स ०.०८% ने वाढला. तर एस अँड पी ५०० आणि नॅसडॅक अनुक्रमे ०.३९% आणि १.२०% ने घसरले. एसजीएक्स निफ्टीने ४२ अंकांच्या किरकोळ वाढीसह मंगळवारच्या सत्राची सकारात्मक सुरुवात केली. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी ५० हे येथील प्रमुख निर्देशांक तेजीसह व्यवहार करत होते.

सकाळी १०:१५ वाजता बीएसई सेन्सेक्स ०.८८% वर व्यवहार करत होता आणि ५३,४४०.३२ वर होता. टाटा स्टील, आयटीसी लिमिटेड आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे सेन्सेक्समधील सर्वाधिक वाढणारे समभाग ठरले. तर एशियन पेंट्स, सन फार्मास्युटिकल्स आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या समभाग मूल्यावर विपरित परिणाम झाला. बीएसई मिडकॅप ०.७४% ने वाढला आणि २२,३०८.७० वर व्यापार करत होता. तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.९२% ने वाढला आणि २५,८४२.६९ वर होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.