ब्युरो :
मनं उडू उडू झालं या मालिकेतून सध्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे विवाहबंधनात अडकली. तिचा बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. यानंतर सोशल मिडीयावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.
हृताने डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेंड प्रतीक शाहसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर आता या दोघांनी नुकतीच लग्नागाठ बांधली असून या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहे.
हृताच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट करत तिला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हृताने दुर्वा मालिकेतून सिरीयल क्षेत्रात पदार्पण केलं. यानंतर फुलपाखरू सिरीयलमधील हृताच्या लूकला विशेष पसंती मिळाली. याच मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयावर तिने अधिराज्य गाजवलं. तर आता मनं उडू उडू झालं या तिच्या मालिकेला प्रेक्षकांची तेवढीच पसंती मिळतेय. शिवाय अभिनेता उमेश कामतसोबत मुख्य भूमिका असलेल्या ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचेही शो हाऊसफुल होतायत.
हृताच्या नव्या प्रोजेक्टबद्दल सांगायचं तर ‘अनन्या’ च्या माध्यमातून ती मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.