शेअर बाजारात प्रचंड घसरण | एकाच दिवसातच 6.36 लाख कोटींचं नुकसान

0
93

मुंबई : 

मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अत्यंत निराशाजनक राहिला. बाजारात आज मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे तब्बल 6.36 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मार्च 2020 नंतर इन्ट्रा-डे मध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण झाली आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1416 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 430 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 2.61 टक्क्यांची घसरण होऊन तो 52,792 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 2.65 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,809 वर पोहोचला आहे.

सेन्सेक्ससोबत निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली आहे. 24 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच निफ्टीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. आजच्या घसरणीनंतर शेअर बाजारातून तब्बल 6.36 लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. त्यामुळे शेअर बाजारातील एकूण भांडवल हे 255.7 लाख कोटीवरुन 249.40 लाख कोटी रुपयांवर आलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.