रांगड्या कोल्हापूरकरची हटके लव्हस्टोरी | भलंंमोठंं होर्डिग लावत लग्नासाठी प्रपोज

0
598

कोल्हापूर : 

कोल्हापुरात आज दिवसभरात चर्चा रंगली ती फक्त आणि फक्त होर्डिंग्ज प्रपोजची. हटके अंदाजाने प्रपोज करण्याच्या नादात त्याने चक्क भलेमोठे होर्डिंग्ज लावले आणि लग्नासाठी मागणी घातली. कोल्हापुरातल्या सौरभ कसबेकरने उत्कर्षा हीला चक्क मोठं होर्डिंग लाऊन प्रपोज केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्या मुलगीने सुद्धा त्याला होकार दिला आहे. एव्हढंच काय तर त्या मुलीच्या आणि मुलाच्या घरचे सर्वजणसुद्धा यांच्या नात्यासाठी तयार झाले आहेत.

कोल्हापुरातील सौरभ कसबेकर आणि सांगलीमधील मुलगी उत्कर्षा दोघेही बुधगाव-सांगली येथील वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमधून शिक्षण घेत होते. सौरभची आणि उत्कर्षाची शेवटच्या वर्षापर्यंत सुद्धा काही खास ओळख नव्हती. मात्र जेव्हा इंजिनिअरिंग पूर्ण झाली तेव्हा सौरभच्या घरच्यांनी त्याला त्याच्या मनात कोणी असेल तर सांग आम्ही रीतसर मागणी घालू असं त्याला सांगितलं.

मग या पठ्ठ्याने तात्काळ कॉलेजमधील उत्कर्षा नावाची मुलगी होती, आणि ती त्याला आवडायची असं सांगितलं. त्यामुळे त्यांनी रीतसर तिच्या घरी लग्नासाठी मागणी घालायचे ठरवले. त्यानुसार सौरभच्या वडिलांनी उत्कर्षाच्या घरी मागणी घातली. उत्कर्षाच्या घरच्यांचे सुद्धा काही दिवस होय नाही, होय नाही हेच सुरू होते.

उत्कर्षाकडून सुद्धा अद्याप होकार आला नव्हता. अनेक प्रयत्नानंतर शेवटी घरचे सुद्धा तयार झाले. मात्र लग्नासाठी अनोख्या पद्धतीने तिला प्रपोज करायचे असे सौरभने ठरवले होते. त्यानुसार त्याने कोल्हापूर-सांगली रोड वर एका होर्डिंगद्वारे प्रपोज करायचे ठरवले. या नियोजनानुसार सौरभने चक्क हायवेच्या शेजारीच भलामोठं होर्डिंग लावलं आणि उत्कर्षाला प्रपोज केलं.

या होर्डिंगचे आणि सौरभ-उत्कर्षाचे प्रपोज करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या या अनोख्या प्रपोजची चर्चा सर्वत्र रंगली असून अनेक प्रेमवीरांनाही नवीन आयडीया मिळाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.