मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ज्याची चर्चा होती तो मनसेच्या अयोध्या दौऱ्याची. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येला जाणार होते. मात्र, त्यांनी ट्विट करून तूर्तास आपण हा दौरा स्थगित करत असल्याचे सांगितलं आहे.