फोंडाघाटात वाळूच्या ट्रकचा अपघात !

0
143

फोंडाघाट : रात्री ८ च्या दरम्यान एसटी स्टँडच्या जवळील रस्त्याच्या उतारावर वाळू भरून, घाटमाथ्यावर जाणारा ट्रक रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये, ब्रेक लावल्यानंतर रस्ता सोडून गटारा लागून असलेला संरक्षक कठडा तोडून कलंडला. लगतचे पारकर व बबन बालेघाटकर यांचे कुटुंबीय घरात असल्याने बालंबाल बचावले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. काल सायंकाळपासून फोंडाघाट मध्ये पावसाची रिमझिम सुरू झाली. त्यामुळे रस्ता निसरडा झाला होता.

गुरुवार रात्री आठच्या दरम्यान वाळू भरून घाटमाथ्यावर जाणारा ट्रक ब्रेक लावल्यावर रस्त्याच्या निसरडेपणाचा अंदाज न आल्याने गटारा लगतचा कठडा फोडून कलंडला. अन्यथा शेजाऱ्यांच्या अंगणात ट्रक उलटला असता आणि मोठे नुकसान आणि अनर्थ घडला असता. रात्री या स्थितीत दुसऱ्या गाडीत वाळू भरून रस्ता मोकळा करण्यात आला. गेल्यावर्षीदेखील एसटीची गाडी या ठिकाणी कलंडली होती. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्ते बांधकाम विभागाने यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.