कुंभार बांधवानी एकजुट दाखवावी : सतीश दरेकर

0
203

सिंधुदुर्गनगरी : कुंभार समाजाची लोकसंख्या दाखविण्यासाठी साठी संघटनेने जनगणनेचे काम हाती घेतले असून असून हे काम कुंभार बांधवानी एकजुटीने पूर्ण करून समाजाची ताकद दाखवावी कारण समाजाला ताकद दाखविण्याची आता वेळ आली आहे असे प्रतिपादन कुंभार सामाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सतीश दरेकर यांनी केले. संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्ग च्या वतीने कुंभार समाज जिल्हा मेळावा कसाल हायस्कुल येथे नुकताच झाला. मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी दरेकर बोलत होते. यावेळी गोव्याचे आमदार प्रेमेन्द्र शेठ, जिल्हाध्यक्ष गणपत शिरोडकर शरद वाडेकर तुळशीदास कुपेरकर, रामदास सागवेकर, वसंतराव धोडनिधीकर, प्रकाश भालेराव ज्ञानेश्वर सोमवती प्रकाश साळवी यशवंत शेठुलकर, दीपक बुरवाडकर, सुभाष शेटकर, ऍड जयंत गुडेकर बंडेरावर कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. दरेकर म्हणाले कुंभार बांधवानी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या बनवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये शासनाकडून कुंभार बांधवांना माती पुरविण्याची परवानगी देण्यात आली असून एप्रिल ते मे महिन्यात वर्षभरासाठी लागणारी माती उचलावी तसेच बेरोजगारां चा प्रश्न रोजगार मेळावा घेऊन सोडवला जाणार आहे संघटना चांगली काम करीत असून कुंभार समाज आता पुढे जात आहे महिलांना प्रतिनिधित्व देऊन संघटनेला महिलांचा पाठिंबा मिळवावा त्यासाठी लवकरच महिला सक्षमीकरणाचे काम संघटनेमार्फत सुरू होणार आहे. समाज भवनासाठी चांगला आराखडा तयार करा त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य लाभेल. आमदार प्रेमेन्द्र शेठ म्हणाले गोवा व सिंधुदुर्ग एक असून हे नाते टिकविण्याचे काम संघटना करीत आहे गोव्यामध्ये कुंभार समाज अल्प असून कुंभार समाज गोव्याचे प्रतिनिधित्व करीत आहे कुंभार बांधवांनी गोरोबा काकांचा आदर्श असे आवाहन त्यांनी केले यावेळी विलास गुडेकर प्रकाश भालेराव शरद वाडेकर यांनी विचार मांडले. सतीश दरेकर यांच्या हस्ते संतश्रेष्ठ गोराकुंभार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सतीश दरेकर, यांच्या हस्ते तालुका अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला त्याच प्रमाणे ासकीय सेवेत उल्लेखनीय काम करणार्‍या बांधवांचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक प्रा, गणपत शिरोडकर यांनी केले सूत्रसंचालन नारायण साळवी यांनी केले आभार दिलीप सागवेकर यांनी मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.