सावंतवाडी-दिवा पॅसेंजरची अन्नपूर्णा…

0
893

सिंधुदुर्ग : अतिशय अदबीने बोलणाऱ्या आणि हसतमुख असलेल्या अनुष्काताई कणकवलीच्या रहिवासी आहेत. कोकणचं वैभव असलेल्या आंबोळी चटणीची विक्री करत अनुष्काताईंनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली.

गेली 5-6 वर्षे त्या पुरणपोळीची विक्री कोकण रेल्वे मध्ये करतात. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर हे त्याचं हक्काचं विक्री केंद्र. कधीतरी स्टेशनवर क्रॉसिंगसाठी दुसरी एखादी ट्रेन असेल तर तिथेही त्या आपल्या पुरणपोळ्या इतरांना खाऊ घालतात.

अनुष्का ताईकडच्या पुरणपोळ्या अतिशय मऊ लुसलुशीत आणि चविष्ट आहेत. दररोज जवळपास 200 पुरणपोळ्या त्या बनवतात. 50 रुपयाला एक पॅकेट असून त्यात 3 पुरणपोळ्या असतात.

जवळपास 12 वर्षे सातत्याने व्यवसाय करणे आणि हे करत असताना नेहमी हसतमुख राहणे, ग्राहकांशी अदबीने संवाद साधणे आणि तेही मालवणी, कोकणी माणसाने म्हणजे जरा अवघडच. पण अनुष्का ताई हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या व्यावसायिक कर्तृत्वाला सलाम.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.