महाचॅनेलला गझल महासम्राटांची भेट, महाचॅनेलच्या उपक्रमांचे केले कौतुक

0
73

सावंतवाडी : महाराष्ट्रातील दिग्गज गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी आज कोकणचे नंबर १ महाचॅनेल कोकणसाद लाईव्हच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी कोकणसाद लाईव्हच्या सुसज्ज स्टुडिओचे त्यांनी अतिशय कौतुक केले आणि कोकणातील विविध प्रश्नांना महाचॅनेल वाचा फोडत असल्याचे सांगत महाचॅनेलच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

प्रारंभी कोकणलाईव्हचे कार्यकारी संपादक अर्जुन धस्के यांनी गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा महाचॅनेलच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी कोलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप वाडकर, कोकणसाद लाईव्हच्या उपसंपादक व अँकर जुईली पांगम, विद्देश धुरी, मयुरेश राऊळ, प्रसाद कदम, किरण काळोजी यांच्यासह टीम कोकणसाद LIVE उपस्थित होती.

यानंतर महाचॅनेलच्या स्टुडिओत गझल नवाज भीमराव पांचाळे यांची मुलाखत प्रा. रुपेश पाटील यांनी घेतली. यादरम्यान कोकणसाद LIVe च्या आठ वर्षातील खडतर पण प्रगतीशील वाटचालीबद्दल गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी तोंडभरून कौतुक केले.

तसेच आपल्या सुमारे पन्नास वर्षाच्या गझल प्रवासाबद्दल भीमराव पांचाळे यांनी महाचॅनेलच्या महामंचावरून रसिकांशी संवाद साधत अनेक गंमतीशीर आणि भावनिक किस्से उलगडले.

गझल घडविते जीवनाचे यथार्थ दर्शन

यावेळी सुप्रसिद्ध गझलसम्राट भिमराव पांचाळे म्हणाले की गझल म्हणजे आपल्या जीवनाच्या संपूर्ण घडामोडींची उकल करणारे आणि आपल्या जीवन प्रवासाचे यथार्थ दर्शन घडविणारे काव्य आहे. महाराष्ट्रात सुरेश भट, इलाही जमादार, तसेच सिंधू भूमिपुत्र दिवंगत मधुसूदन नानिवडेकर यांसारख्या दिग्गज गझलकार यांची परंपरा लाभली आहे. आज हे तीनही गझलकार आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेल्या शब्दरूपी संदेशातून महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभर गझलच्या माध्यमातून रसिक मनांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले आहे. याबद्दल आपल्याला खूप अभिमान असल्याचे पांचाळे यांनी कथन केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.