कणकवली : शहरातील उषा कंट्रक्शन समोरील वीज तारा तूटल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. मागील चार दिवसापूर्वी देखील या तारा तुटल्या होत्या आणि वीज पुरवठा खंडित झाला होता आज पुन्हा तेथील तारा रात्री 8:45 च्या सुमारास तुटल्याने वीजपुरवठा बराच वेळ खंडित करण्यात आला होता. खंडित वीज पुरवठ्यामुळे हर्णे आळी तेली आळी व आजूबाजूच्या भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले होते.
यासंबंधी वीज अधिकार्यांनी नेमक्या तारा कशामुळे तुटल्या याची माहिती नसून तारा जोडण्याचे काम हाती घेतलं असल्याचे सांगितले