यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक इथं ‘जॉब फेअर कॅम्पस ड्राईव्ह’

0
75

सावंतवाडी : यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे नुकताच जॉब फेअर २०२२ चा कॅम्पस ड्राईव्ह संपन्न झाला. पुणे येथील सहा नामांकित कंपन्यांमार्फत यावेळी विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेतले गेले. या सर्व कंपन्या ऑटोमोटिव्ह सेक्टरमधील होत्या.

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकसोबतच इतर तंत्रनिकेतन संस्थांचे विद्यार्थीदेखील यामध्ये सहभागी झाले होते.जॉब फेअरचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून यामध्ये यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या एकूण ८३ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड झाली आहे.अँफेनॉल ही इलेक्ट्रो-मेकॅनिकल प्रॉडक्टस बनवणारी तसेच ऍडव्हान्स इंटरकनेक्ट सिस्टीम, क्रॅंकशाफ्ट्स व रेल्वे सामुग्रीचे सुटे भाग बनविणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीच्या पुणे येथील प्रकल्पासाठी कॉलेजच्या १५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.अमेरिकन ऍक्सल मॅन्युफॅक्चरिंग ही रियर ऍक्सल तसेच इतर ऑटोमोटिव्ह पार्ट्स बनवणारी अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीच्या पुणे येथील प्रकल्पासाठी कॉलेजच्या ५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

जीकेएन ही एरोस्पेस व ऑटोमोटिव्ह कंपोनेंट्स बनविणारी आघाडीची ब्रिटिश कंपनी आहे. तिच्या पुणे येथील प्रकल्पासाठी कॉलेजच्या ७ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.जॉन डिअर ही ट्रॅक्टर तसेच कृषी विषयक अवजारे बनविणारी आघाडीची अमेरिकन कंपनी आहे. तिच्या पुणे येथील प्रकल्पासाठी कॉलेजच्या १५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स ही ऑटोमोटिव्ह सेक्टरमधील वाहनांचे लाईटस बनविणारी कंपनी आहे. या कंपनीच्या पुणे येथील प्रकल्पासाठी कॉलेजच्या १८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.टाटा ऑटोकॉम्प ही वाहन उद्योगाला सुटे भाग पुरविणारी आघाडीची कंपनी आहे. या कंपनीमध्ये कॉलेजच्या ५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.डॅना ही वाहन उद्योगातील सुटे भाग निर्मिती करणारी तसेच इलेक्ट्रिक वाहनांचे पार्ट्स बनविणारी अमेरिकन कंपनी आहे. कंपनीच्या पुणे येथील प्रकल्पासाठी १५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.