हुबळी : धारवाडजवळ झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना विसरण्यापूर्वीच आज हुबळी-धारवाड बायपासवर मोठी दुर्घटना घडली. बस आणि ट्रक अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
आज पहाटे 1 च्या दरम्यान कोल्हापूरहून बेंगळूरला जात असलेली नॅशनल ट्रॅव्हल्स ची बस (KA 51 AA 7146) एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात जागीच 6 जण आणि रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला. 24 जण जखमी झाले असून त्यांचा उपचार सुरू आहे.