आमदार नितेश राणेंचं बबनरावांना पत्र

0
573

सावंतवाडी : ए.जी. डॉटर्स वेस्ट प्रोसेसिंग प्रा. लि. ही नामांकित कंपनी विनामूल्य कचरा उचलण्याचे काम करत आहे. शहरातला कचरा विनामुल्य उचलून त्या बदल्यात शहराला वीज,पाणी व गॅस माफक दरात पुरविण्याचे काम हि कंपनी करणार आहे. सावंतवाडी नगरपालिकेन देखील यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन आमदार नितेश राणेंनी बुधवारी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना पत्राद्वारे केलं आहे. ए.जी. डॉटर्स वेस्ट प्रोसेसिंग प्रा. लि. ही नामांकित कंपनी नगरपंचायत, नगरपरिषद परिसरातील कचरा विनामूल्य उचलणार असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आल आहे. पर्यटन जिल्ह्यात स्वच्छता हा महत्त्वाचा मुद्दा असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून पावले उचलणे गरजेचे असल्याचे आमदार नितेश राणे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. कुठलाही आर्थिक भार न वाढविता शहरातला कचरा विनामुल्य उचलून त्या बदल्यात शहराला वीज,पाणी व  गॅस माफक दरात पुरविण्याचे नियोजन व विश्वास या कंपनीने दिला आहे. तसेच १ टक्का वार्षिक निधी देखील नगरपंचायतीला दिला जाणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले होते. हा कचरा उचलण्याची यंत्रणा  डॉटर्स वेस्ट प्रोसेसिंग कंपनीची असणार आहे. 
कणकवली नगरपंचायतने देखील या कंपनीला  २५ वर्षाच्या लीजवर डम्पिंग ग्राऊंडची जागा दिली आहे. तसेच जिल्हाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली आठही तालुक्यातील मुख्याधिकार्यांना सोबत घेऊन यासंबंधी बैठक घेतली होती.शहरातील विनाशुल्क कचऱ्याचा प्रश्न हि कंपनी मार्गी लावणार असून सावंतवाडी नगरपालिकेने शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी  कंपनीचं सहकार्य घ्यावं असं आवाहन आमदार नितेश राणेंनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना पत्राच्या माध्यमातून केल आहे.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here