वाहतूक नियंत्रक पंढरी चव्हाण यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार  

0
352

कुडाळ : 
एसटी महामंडळात सेवा करताना अधिकारी, सहकारी कर्मचारीवर्ग, कुटुंबीय, मित्रपरिवार या सर्वांनी साथ दिली. प्रवाशांना चांगली सेवा देता आली, यातच आपले मोठे समाधान आहे. त्याचबरोबर समाजासाठी काम करताना सर्वांचे सहकार्य मिळाले. एसटी महामंडळातून जरी सेवानिवृत्त होत असलो तरी, यापुढील काळात समाज आणि समाजकार्यासाठी नेहमीच कार्यरत राहणार आहे. आज तुम्हा सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा निश्चितच प्रेरणादायी ठरतील, असे सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक पंढरी चव्हाण यांनी सांगितले.

कुडाळ एसटी आगाराचे वाहतूक नियंत्रक पंढरी महादेव चव्हाण मंगळवारी नियम वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यानिमित्त भारतीय चर्मकार समाज मुंबई-महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा संघटना व मित्रपरिवार यांच्यावतीने त्यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार व वाढदिवस सोहळ्याचे आयोजन कुडाळ येथील मराठा समाज हाॅल(एसी)च्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी संघटनेची राज्य, जिल्हा, कोकण विभाग आणि तालुका कार्यकारीणी तसेच एस.टी कर्मचारी, मित्रपरिवार व नातेवाईक यांच्या वतीने श्री.चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

एसटी महामंडळात वाहतूक नियंत्रक चव्हाण यांनी उत्कृष्ट अशी सेवा केली. वाहक ते वाहतूक नियंत्रक असा त्यांचा यशस्वी प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. सामाजिक आणि समाज कार्यातही त्यांचे काम आदर्शवत असेच आहे. त्यांचे मार्गदर्शन सर्वाना प्रेरणादायी ठरेल. त्यांनी यापुढील काळात समाजकार्यात असेच कार्यरत राहावे, अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी पंढरी चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करीत, त्यांना सेवानिवृत्तीपर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सौ.मालिनी पंढरी चव्हाण, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष सुरेश चौकेकर, राज्य सरचिटणीस अरूण होडावडेकर, राज्य उपाध्यक्ष प्राजक्त चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर, के.टी.चव्हाण, नामदेव चव्हाण, डाॅ.प्रतिक्षा चव्हाण, कणकवली तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण, कुडाळ तालुकाध्यक्ष रघुनाथ चव्हाण, कुडाळच्या शिक्षण विस्तार अधिकारी सौ.सुनिता भाकरे, एसटी आगारातील सुरेंद्र मोरजकर, श्री.आंबेस्कर, पी.एन.ठाकूर, भाऊ वालावलकर, सुरेश पवार, सचिन चव्हाण आदींसह राज्य, कोकण विभाग, जिल्हा आणि सर्व तालुका कार्यकारीणी पदाधिकारी, एसटी कर्मचारी, मित्रपरिवार व चव्हाण कुटुंबिय आदी उपस्थित होते. कोकण विभाग युवक अध्यक्ष भारत पेंडुरकर यांनी पंढरी चव्हाण यांच्या कार्याचा जीवनपट वाचन केला. अनेक मान्यवर, पदाधिकारी, एसटी कर्मचारी, मित्रपरिवाराने शुभेच्छापर मनोगत व्यक्त करीत श्री.चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.