नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने क्रिकेटमध्ये ३० वर्षे पूर्ण केली आहेत. स्वत: सौरव गांगुलीने बुधवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली. तो आयुष्यामध्ये नवीन गोष्टीची सुरुवात करणार आहे. त्यासाठी चाहत्यांच्या समर्थनाची आवश्यकता, असे ट्विट त्याने केले आहे. त्याच्या या ट्विटमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. गांगुली बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा देणार का? तो राजकारणात प्रवेश करणार का? असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होते आहेत.