कुडाळची कन्या ठरली सुवर्णपदकाची मानकरी

0
1332

सिंधुदुर्गनगरी :

नादियाड ( गुजरात ) येथे नुकत्याच झालेल्या ज्युनिअर फेडरेशन करंडक अॅॅथलेटिक्स स्पर्धेत शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या अॅॅथलेट्सने दोन सुवर्ण, चार ब्राँझपदके जिंकली. त्यात पूर्वा सावंत आणि पल्लवी जगदळे सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील भडगावची कन्या असलेल्या पूर्वा सावंतने मुलींच्या तिहेरी उडीत चौथ्या प्रयत्नात १२.६५ मीटर अंतरावर उडी मारीत सुवर्णपदक निश्चित केले. पूर्वा सावंत हिने यापूर्वी देखील आणि अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे.

बंगळूर येथे अंजू जॉर्ज फाऊंडेशनमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या पूर्वाने सुवर्णपदक जिंकले असले , तरी तिला जागतिक ज्युनिअर स्पर्धेसाठी असलेली १२.८५ मीटरची पात्रता गाठण्यात अपयश आले. पल्लवी जगदळेने मुलींच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत बाजी मारली. तिने ११ मिनिटे २५.२५ सेकंद वेळ दिली. मुलांच्या उंच उडीत अनिकेत मानेने ( २.०६ मीटर ) , हातोडाफेकीत प्रतीक पिंगळेने (६३.९ १ मीटर) ने ब्राँझपदक जिंकले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सर्वच स्तरातून पूर्वा सावंत हीच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.