आताची सर्वात मोठी बातमी | आघाडीला भाजपचा ‘दे धक्का’ | महाडीक जिंकले !

0
1939

मुंबई : राज्याच्या राजजकारणात कित्येक दिवस बहुचर्चित असलेल्या राज्यसभेच्या सहा जागांचा आज पहाटे चार वाजता निकाल लागला. यात सहाव्या जागेवर भाजपचे कोल्हापूरचे उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले. धनंजय महाडिक यांनी 41 मते घेत सहाव्या जागेवर विजय साजरा केला आहे. तर शिवसेनेच्या संजय पवार यांना 33 मते मिळाली आहेत.

एकुण सहा जागांपैकी भाजपला 3 तर महाविकास आघाडीला 3 जागा मिळाल्या. यात शिवसेना-1, काँग्रेस-1, राष्ट्रवादी-1, भाजप-3 असे पक्षीय बलाबल आहे. संजय राऊत-41 (शिवसेना), प्रफुल्ल पटेल-43 (राष्ट्रवादी), इम्रान गडी-44 (काँग्रेस), पियुष गोयल-48 (भाजप), अनिल बोंडे-48 (भाजप), धनंजय महाडिक-41 (भाजप) हे विजयी झाले आहेत.

संजय पवार-33 (शिवसेना) हे पराभूत झाले आहेत. ह्या मोठ्या विजयाने भाजपला एक मोठं बळ मिळाले आहे. तर सत्तेतील शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. भविष्यात या पक्षातील कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहेत. महाविकास आघाडीतील अपक्षांची सुमारे 10 मतं फुटल्याची चर्चा आहे. अपक्षासह अनेकांची 10 मत भाजपने आपल्याकडे वळवत शिवसेनेसह महाविकास आघाडीला एक मोठा धक्का दिला आहे.

या विजयाने कोल्हापूरच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळणार आहे. धनंजय महाडिक यांच्या विजयानंतर कोल्हापुरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. देवेंद्र फडणीस यांनी हा विजय म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना वाढदिवसाची भेट असल्याचे म्हटले आहे. आजारी असून आमच्या दोन आमदारांनी मतदान केले, त्यामुळे हा विजय या दोन आमदारांना समर्पित करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नव्हे, असे सांगत शिवसेनेला जोरदार टोला फडणविसाने लावला आहे. या विजयाने सगळीच राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे फडणवीस म्हणाले. विजयानंतर भाजपच्या आमदारांनी मुंबईत एकच जल्लोष साजरा केला. धनंजय महाडिक यांच्या मुलाला आनंदाचे अश्रू आवरता आले नाहीत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.