राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार !

0
154

सावंतवाडी : कोकणच्या जडणघडणीत येथील ज्येष्ठ नागरिकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर अनेक गोष्टी शिकायला मिळतात, त्याशिवाय आनंदही मिळतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळा सौ. घारे यांच्याच माध्यमातून घेण्यात आला. या कार्यक्रमात “त्या” बोलत होत्या.

यावेळी माजी सरपंच विठ्ठल देसाई, भालावल माजी सरपंच रमेश परब, पुंडलिक राणे,अभियंता सुर्यकांत पेडणेकर, जिल्हा बँक व्यवस्थापक गुरूदास पेडणेकर,कृषीतज्ञ अनंत गवंडे,निवृत्त शिक्षक दिगंबर पावसकर,माडखोल निवत्त मुख्याध्यापक प्रकाश राऊळ, नेमळे हायस्कूल अध्यक्ष आत्माराम राऊळ, आदीचा सन्मान करण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी पालकमंत्री प्रवीण भोसले, माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ रेवती राणे, जिल्ह्याचे भास्कर परब, तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, जेष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष अण्णा देसाई, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नझीर शेख, अफरोज राजगुरू,सावली पाटकर, बी एन तेली, सौ चित्रा देसाई बाबर, हिदायतुल्ला खान, जेष्ठ नागरिक प्रकाश राऊळ, सुधीर घुमे, दत्ताराम सडेकर, अनंत माधव, रामानंद शिरोडकर, रामदास पारकर, डि. के. सावंत, आत्माराम राऊळ आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.