जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी हरिश्चंद्र पवार बिनविरोध !

0
108

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी सावंतवाडी तालुका पत्रकार समितीतर्फे हरिश्चंद्र चंद्रकांत पवार यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. सावंतवाडी तालुका पत्रकार समितीची अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ही निवड करण्यात आली.

रविवारी सावंतवाडी येथील नगरपरिषदेच्या पत्रकार कक्षामध्ये सावंतवाडी तालुका पत्रकार समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीत जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदासाठी हरिश्चंद्र पवार यांच्या नियुक्तीचा ठराव करण्यात आला. हा ठराव अध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांनी मांडला व या ठरावाला अनुमोदन राजू तावडे यांनी दिले आणि हरिश्चंद्र पवार यांच्या निवडी बाबतचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी हरिश्चंद्र पवार यांची जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणी सदस्य पदी फेरनिवड झाल्याबद्दल तालुकाध्यक्ष प्रवीण मांजरेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीस जिल्हा पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, राजेश मोंडकर, मोहन जाधव, सावंतवाडी तालुका समिती खजिनदार रामचंद्र कुडाळकर, तालुका पत्रकार समितीचे माजी सचिव अमोल टेंबकर, कार्यकारणी पदाधिकारी जतिन भिसे, मयूर चराठकर, अभय पंडित, उमेश सावंत, विनायक गांवस, नरेंद्र देशपांडे, शुभम धुरी, निखिल माळकर, गणेशप्रसाद गोगटे आदी उपस्थित होते.

जिल्हा पत्रकार संघाची पदाधिकारी निवड लवकरच होणार असून त्याविषयीही चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये माजी अध्यक्ष विजय देसाई, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, मोहन जाधव यांनी भाग घेतला. यावेळी सावंतवाडी तालुका पत्रकार समितीचे सदस्य विनायक गांवस यांच्यावरील दाखल करण्यात आलेल्या सरकारी कामातील अडथळा गुन्हा प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याबाबतही निर्णय झाला. तर कबड्डी फेडरेशन प्रकरणी वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या प्रकरणांमध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी आदेश देऊनही जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडून कोणतीही कारवाई न झाल्याबाबत त्यांना जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने भेट घेण्याच्य निर्णयाला तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी समर्थन देऊन या शिष्टमंडळात सहभागी होण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.