धामापूर पेठवाडीत सोनेरी कोल्ह्याला जीवदान !

0
308

कुडाळ : धामापूर पेठवडीत आज दुपारी 12.00 वाजन्या च्या सुमारास मालवण तालुक्यातील मौजे धामापूर पेठवाडीतील ग्रामस्थ सुशीलकुमार घाडी यांन च्या घरालगत दिनेश काळसेकर यांच्या विहीरी मध्ये कोल्हा पडला असलेचे सांगितले असता वनपरिक्षेत्र कुडाळ चे रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत 15 ते 20 फूट खोल विहिरीतून त्यास सुखरूप बाहेर काढले. अशी माहिती फॉरेस्ट विभागाचे अधिकारी अमृत शिंदे यांनी दिली भक्ष्याच्या मागे धावताना अंदाज न आलेने कठडा नसलेल्या या विहिरीत वन्यप्राणी कोल्हा आत मध्ये पडला असावा असे वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ अमृत शिंदे यांनी सांगितले. पाण्याची पातळी सुमारे 4 ते 5 फूट असलेल्या या विहिरीत कोल्ह्याने बिळ केल्याने तो पाण्याबाहेर येताच त्या बिळामध्ये जात असलेने अडचण येत होती अखेर अथक प्रयत्नाने त्यास पिंजऱ्यात घेण्यात बचाव पथकास यश आले. अमृत शिंदे म्हणाले ग्रामस्थांनी वेळीच माहिती वनविभागाला देऊन बचाव कार्यास देखील मदत केल्याने या सोनेरी कोल्ह्याचा जीव वाचवता आला त्यासाठी ग्रामस्थांचे वनविभागाकडून आभार व्यक्त करण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मूक्त करण्यात आले .
सदर वन्यप्राणी सोनेरी कोल्ह्या याचे रेस्क्यु प्रभारी उपवनसंरक्षक दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे , वनपाल मालवण श्रीकृष्ण परीट, वनरक्षक धामापूर शरद कांबळे, वाहनचालक राहुल मयेकर यांनी स्थानिक ग्रामस्थ सुशील घाडी, बाळकृष्ण घाडीगावकर, दिनेश काळसेकर, तेजस वालावलकर, चेतन काळसेकर यांच्या मदतीने यशस्वी केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.