कुणाचा पत्ता कट ? कुणाला लॉटरी ? ; न.प. आरक्षण जाहीर !

0
706

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरीषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग 10 मध्ये 20 सदस्यांसाठीचं आरक्षण आज जाहीर झाले आहे. प्रभाग 9 मध्ये अनुसूचित जाती-जमाती पुरुषसाठी आरक्षण पडले असून सर्वसाधारण महिला या ठिकाणी आरक्षण झाले आहे. प्रभाग 1 ते 8 मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण पडले असून प्रभाग 10 मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. प्रभाग 9 मध्ये अनुसूचित जाती-जमाती स्त्री आरक्षण पूर्वी होते. त्याठिकाणी शिवसेनेच्या माधुरी वाडकर या सदस्य होत्या. त्या ठिकाणी पुरुष आरक्षण पडले आहे. या ठिकाणाहून अनेक दिग्गज इच्छुक असून नव्या चेहऱ्यांसह माजी नगरसेवकही रेसमध्ये आहेत. प्रत्येक प्रभागात दोन सदस्य संख्या असणार असून दहा महिला सदस्यांना संधी मिळाली आहे. या आरक्षण सोडतीसाठी माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, भारती मोरे, राजू बेग, सुरेश भोगटे, दिलीप भालेकर, संजू शिरोडकर आदींनी हजेरी लावली होती. प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत हे आरक्षण जाहीर झाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.