गोल्डन बॉय नीरज चोप्राचा नवा रेकॉर्ड | स्वतःचाही मोडला रेकॉर्ड

0
158

मुंबई : 

भालाफेक पटू नीरज चोप्रा याने पावो नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटर भालाफेक करुन नवा राष्ट्रीय विक्रम रचला आहे. या विक्रमाबरोबर त्याने त्याच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये केलेला 87.58 मीटरचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करताना नीरज चोप्रा याने भालाफेकमध्ये सुवर्ण कामगिरी केली. त्याने आता  स्वत:चाच टोकियो ऑलिम्पिकमधील विक्रम मोडत नवीन इतिहास रचला आहे. नीरजने पोलंडमध्ये सुरु असलेल्या जागतिक अँथलेटिक्स स्पर्धेत 89.30 मीटर भालाफेक करत हा नवीन विक्रम रचला आहे.

सध्या फिनलँडमध्ये सुरू असलेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्रा सहभागी झाला आहे. त्याने 89.30 मीटर लांब भालाफेक करत, रौप्य पदक पटकावले आहे. जागतिक अँथलेटिक्स स्पर्धेत चांगली कामगिरी करत  त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये नोंदवलेला स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडला. टोकियो ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच नीरज चोप्रा या स्पर्धेत उतरला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.