शिंदेंची नाराजी दूर करायला गेले | काही सेंकदातच नार्वेकर का बाहेर पडले ?

0
669

सुरत :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे सुरत येथील हॉटेलमध्ये दाखल झाले. ज्या हॉटेल मध्ये एकनाथ शिंदे आणि आमदार उपस्थित आहेत, त्या हॉटेलमध्ये हे शिवसेना नेते दाखल झाले. आपल्या गाडीतून उतरून ते हॉटेलमध्ये गेले. मात्र, हॉटेल मधून ते लगेचच हॉटेलच्या बाहेर आले. त्यानंतर गाडीत बसून ते लगेच गाडीत बसून निघून गेले. काही सेकंदात मिलिंद नार्वेकर हॉटेल मधून बाहेर पडले. त्यामुळे नार्वेकर यांची एकनाथ शिंदे यांची भेट झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ज्या हॉटेल मध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगितले गेले. त्या हॉटेलला एकनाथ शिंदे आणि आमदार नसल्याचे लक्षात आले. चुकीच्या हॉटेलमध्ये नार्वेकर आणि फाटक गेले होते. तसे लक्षात येताच ते हॉटेल मधून बाहेर पडले. आता नार्वेकर हे विमानतळाच्या बाजूला जे हॉटेल आहेत त्या दिशेने रवाना झाले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.