मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक शिंदेंच्या हॉटेलबाहेर !

0
702

सुरत : शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे आता एकनाथ शिंदे वास्तव्यास असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत. पहिल्यांदा चुकीच्या हॉटेलला नार्वेकर गेले होते. ते लक्षात येताच नार्वेकर तिथून रवाना झाले. त्यानंतर आता ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आहेत त्या हॉटेलवर मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक पोहोचलेले आहेत. सुरतच्या ‘ली- मेरीडिअन’ या हॉटेल परिसरात गाड्या थांबविण्यात आलेले आहे. हॉटेल बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अद्यापही नार्वेकर गाडीतून उतरले नाहीत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.