नार्वेकर हॉटेलमध्ये पोचले | शिंदेंची नाराजी दूर करण्यात यश येणार ?

0
567

सुरत :

अखेर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना हॉटेलमध्ये सोडण्यात आले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि आमदारांची समजूत काढण्यासाठी हे दोन्ही नेते सुरत मध्ये दाखल झाले आहेत. मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक या दोघांनाच हॉटेलमध्ये सोडण्यात आले आहे. हॉटेलच्या बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. मुंबई पोलीस सुद्धा सुरत मध्ये दाखल झाले आहेत. मात्र, त्या पोलिसांना हॉटेलमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आल आहे. त्यांना बॅरिकेट्सच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन शिवसेनेचे दोन्ही नेते एकनाथ शिंदे यांना समजूत काढण्यात यशस्वी होतात काय ? एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.