आता व्हा टेन्शन फ्री | मोफत मेडीटेशन शिबिराची संधी | दक्षिण भारतातील प्रसिद्ध श्री सत्यमामुनी यांचं मार्गदर्शन

0
227

पणजी :

वाढती स्पर्धा आणि धकाधकीचं जीवन यामुळे कमालीचा ताण वाढलाय. यावर आता एकच पर्याय तो म्हणजे मेडीटेशनचा. आता हेच मेडीटेशन मोफत मिळणार असून ही संधी तुम्हालाही उपलब्ध होणार आहे. गोव्यात 25 जूनला खास महासंजीवनी मेडीटेशन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. दक्षिण भारतातील प्रसिध्द आध्यात्मिक आणि मेडीटेशन गुरू श्री. सत्यमामुनी स्वामीजी हे मेडीटेशन करणार आहेत. शनिवार दि. 25 जूनला सकाळी 9. 30 वाजल्यापासून सुरु होणार या शिबीराचं गोवा – पणजीतील तालीगाव इथल्या डॉ. शामा प्रसाद मुखर्जी स्टेडीयमवर आयोजित करण्यात आलंय. हे शिबीर विद्यार्थ्यांपासून वयोवृद्धांपर्यंत अशा प्रत्येक वयोगटाला फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

सततची धावपळ आणि वाढते आधुनिकीकरण यामुळे अतिशय कमी वयात अनेक रोगांचा सामना करावा लागतो. अगदी लहान वयात डिप्रेशन, मानसिक तणावाला सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेकजण नशेच्याही आहारी जात आहेत. यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मेडीटेशन. भारतीय आयुर्वेदाने दिलेल्या या देणगीच्या माध्यमातून श्री. सत्यमामुनी स्वामींजींनी अनेकांच्या जीवनात नवा प्रकाश आणला आहे. आपल्या अलौकीक ध्यान शक्तीने अनेकांना व्याधीमुक्त केले आहे. आजही ते तणावमुक्त आणि सुखी, समाधानी समाजासाठी या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. याच हेतुने गोव्यात 25 जूनला मेडीटेशनचे मोफत शिबीर घेण्यात येणार आहे.

हे शिबिर कोकण तसेच गोव्यातील अनेक मान्यवारांच्या उपस्थितीत घेतले जाणार आहे. शिबिर पूर्णतः मोफत असून सहभागी होणाऱ्या व्यक्तिंच्या जेवणाची तसेच येण्या जाण्यासाठी बसची देखील सोय करण्यात आली आहे. मेडिटेशन शिबीर मोफत असून मोजक्याच जागा असल्याने नोंदणी अनिवार्य आहे. तरी कृपया कोकण आणि गोव्यातील सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी पुढील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आयोजकांनी कळविले आहे.

नोंदणीसाठी संपर्क क्रमांक : 
9579662543
9404940191

9922928081

9423321126

9284265984
9011043385
8999660656
9834779908

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.