कुडाळ :
कुडाळ मालवण मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक विमानाने गोव्यात पोहचलेत. त्यानंतर रात्री उशिरा कणकवली मध्ये आपल्या निवासस्थानी दाखल होणार आहेत. आज रात्री विश्रांती घेतल्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता ते कुडाळच्या शिवसेना शाखेत मध्ये दाखल होणार आहेत. यावेळी या निष्ठावंत आमदारांचे भव्यदिव्य व जल्लोषी स्वागत शिवसेनेच्या वतीने व शिवसैनिकांच्या वतीने करण्यात येणार आहे. हे जल्लोषी स्वागत झाल्यानंतर आमदार वैभव नाईक शिवसैनिकांना भेटणार आहेत.
यावेळी शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून आमदार वैभव नाईक यांचेही जल्लोषी आणि भव्यदिव्य स्वागत शिवसेनेच्यावतीने होणार आहे. यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक व शहरप्रमुख संतोष शिरसाट यांनी केले आहे.