शिवसेनेच्या फूटीचे कोकणातही पडसाद ? | मालवणात खिंडार पाडण्याच्या तयारीत भाजपा ?

0
657

मालवण :

एकीकडे राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेत उभी फुट पडली आहे. दुसरीकडे तळकोकणात मालवणात अनेक शिवसेना कार्यकर्ते माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिली.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर राज्यात सत्तांतर होणार असल्याने राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मालवणातही भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून राज्या प्रमाणे मालवण तालुक्यातही शिवसेनेला खिंडार पाडण्याच्या तयारीत भाजपा आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी लवकरच मोठा धमाका करणार असून, तालुक्यातील अनेक कार्यकर्ते निलेश राणे यांच्या उपस्थितीत लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.