नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त नांदगावात सामाजिक उपक्रम

0
49

कणकवली :

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव पंचायत समिती गटात विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले आहे. यामध्ये असलदे वृध्दाश्रम येथे जीवनावश्यक वस्तूंचे व जिलेबी वाटप, नांदगाव तिठा येथे शेतकरी बांधवांना जेलिबी आणि रक्त चंदन झाडे वाटप, नांदगाव मधील जिल्हा परिषद शाळेतील व अंगणवाडी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले आहे.

यावेळी भारतीय जनता पार्टी च्या महिला तालुका अध्यक्षा हर्षदा वाळके, तालुका सरचिटणीस पंढरी वायगंणकर, नांदगाव सरपंच अफ्रोजा नावलेकर, आयनल सरपंच बापू फाटक, शेर्फे सरपंच निशा गुरव, सरिता परब, शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, सुशील इंदप, असलदे उपसरपंच संतोष परब, नांदगाव उपसरपंच नीरज मोरये, बूथ अध्यक्ष कमलेश पाटील, राजू खोत, पर्शूराम परब, राजू तांबे, जाफर कुणकेरकर, आनंद गगणग्रास, भूषण म्हसकर, मंदार कुलकर्णी, मारुती मोरये, एकनाथ मोरये, शैलेश टाकळे आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.