नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त गुणवंतांंचा सत्कार | संताजी रावराणेंचा पुढाकार

0
110

वैभववाडी :

आ.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक संताजी रावराणे यांच्या माध्यमातून तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

आमदार नितेश राणे यांचा आज वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. माजी नगरसेवक संताजी रावराणे यांच्या माध्यमातून येथील कलादालनात दहावी, बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम तीन क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्या विद्यार्थ्यांना स्मार्टवॉच देऊन गौरविण्यात आले. गेले तीन वर्षे रावराणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जात आहे. त्यांच्या या उपक्रमाचं माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांनी तोंडभरून कौतुक केलं. संताजी रावराणे यांनी राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे .युवापिढीला शाबासकीची थाप देणे गरजेचे आहे. एक युवा उद्योजक म्हणून संताजी रावराणे हे चांगले काम करीत आहे .त्यांनी हे काम अशाच पद्धतीने करावे असा सल्ला देखील श्री.रावराणे यांनी दिला. माजी सभापती अरविंद रावराणे म्हणाले,विद्यार्थ्यांनी अशाच पद्धतीने अभ्यास करून जीवनात मोठे व्हावे. भविष्यात केव्हाही मदत लागल्यास आम्ही सदैव तयार आहोत असा विश्वास रावराणे यांनी दिला.

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष नेहा माईनकर ,उपनगराध्यक्ष संजय सावंत, माजी सभापती अरविंद रावराणे, जिल्हा परिषद बांधकाम माजी सभापती जयेंद्र रावराणे नगरपंचायत बांधकाम सभापती विवेक रावराणे, भाजपा महिला तालुका अध्यक्षा प्राची तावडे, व्यापारी संघटना तालुका अध्यक्ष रत्नाकर कदम ,नगरसेविक रोहन रावराणे, सुंदरा निकम, यामिनी वळवी, सुप्रिया तांबे आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.