नितेश राणेंचा वाढदिवस जयेंद्र रावराणेंनी अनोख्या पद्धतीने केला साजरा

0
68

वैभववाडी :

आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालय, कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश व किलबिल स्कूल येथे साजरा करण्यात आला.  आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीस विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी शुभेच्छा दिल्या.

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे व नगरसेवक रोहन जयेंद्र रावराणे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आ.नितेश राणे यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. येथील अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात जयेंद्र रावराणे यांनी अनोख्या पद्धतीने हा दिन साजरा केला. विद्यार्थ्यांसमवेत आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसाचा केक कापून दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

यावेळी नगरसेवक रोहन रावराणे, मुख्याध्यापक बी एस नादकर, पी.एम.पाटील, एस बी,शिंदे, पी.जे.सावंत, श्रीम. एस एस.पाटील, एम एस.चोरगे, वाय जी.चव्हाण, एस टी तुळसणकर, पी. बी पवार, व्हि एस.मरगळकर, पी.ए.पाटील, एन व्ही.प्रभू, आर बी चौगले आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.