शिवसेनेची मोठी खेळी | शिंदे गट आमदारांच्या निलंबनाची मागणी | विधानसभा उपाध्यक्षांना पत्र

0
210

मुंबई :

एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार किंवा तो गट शिवसेना पक्षादेशाचं उल्लंघन करत आहेत. त्यामुळे त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत, नवनियुक्त गटनेते अजय चौधरी अजून काही आमदार आणि नेते यांच्या शिष्टमंडळानं विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेटली आहे.

आता बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेने मोठी खेळी केली आहे. शिवसेना नवनियुक्त गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र दिलं आहे. विधानसभेच्या विधीमंडळ बैठकीस गैरहजर राहाणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना उपस्थित राहण्याचं पत्र काढलं होतं, यावर एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली. या आरोप प्रत्यारोपांनंतर शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र देत बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे.

जे आमदार उपस्थित राहिले नाहीत अशा 15 ते 17 आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे, उर्वरित आमदार आमच्या सोबत असल्याचा दावाही अजय चौधरी यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.