कोकणातील शिवसेना नेते अतुल रावराणे मातोश्रीवर !

0
806

मुंबई : कोकणातील शिवसेना नेते अतुल रावराणे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेला खिंडार पडलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान काल सोडलं. या प्रसंगात उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेकडो शिवसैनिक आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेचे बडे नेते अतुल रावराणे यांनी देखील थेट मातोश्री गाठत पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. कोकणासह सिंधुदुर्गातील शिवसैनिक त्यांच्याासोबतअसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.